Sunday, August 22, 2010

फिट्टंफाट

मला तो खूप वेळा भेटलाय. आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण असं म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं.
लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं. कधी आधीच संगनमत करून अचानक यायचा, मग घराकडे येताना दिसेल त्या डबक्यात पचाक्कन उडी मारून पाणी उडवायचो. नंतर कधीतरी नवीन रेनकोटाचा वास आवडायला लागला, पण तेवढ्यापुरताच, नंतर आमचीच खरी गट्टी, रेनकोट हरवायचा चारच दिवसात. पुन्हा एकदा मी त्याला भिजवायचो, तो मला.
त्याही नंतरचा तो आठवतो, मोठा झाल्यावर जरा हूडच झाला होता, कुठेतरी दरयाडोंगरात हाका मारमारून बोलवायचा. चिंब भेटायचा, भजी खायला घालायचा. ओल्या रानात गाणी म्हणत, कविता ऐकवत सोबत चालायचा. लाल चिखलात बरबटलेल्या हातानी पाठीवर थाप मारायचा. कधी तडमताशा वाजवायचा पत्र्यावर, तर कधी अलगद पागोळ्यांवरून ओघळणाऱ्या मोत्यांचे सर घेऊन यायचा भेट म्हणून.
जरासा खट्याळच होत गेला तसा नंतरनंतर, पण परकेपणा नाही जाणवला कधीच, अगदी सखीशी ओळख करून देतानाही, खूप समंजसपणे एकदाच आला होता थोडासा. मग धुक्यात हरवून गेला गुपचूप. नंतर मात्र कित्येक वेळा खऱ्या जीवलगासारखा नेमका मी तिच्याबरोबर असतानाच छापा घालायचा, पाठीवर रपकन धपाटा घालून जायचा.
आज मात्र वेगळाच भेटला, मी हा असा, इतका दूर.. एकाकी.. पोरका.. माझ्या सवंगड्यांपासून. माझ्या सखीपासून, माझ्या स्वतःपासून खुप लांब.. सतत आतून आसुसलेला..
ह्या हिरव्यागार भल्यामोठ्या कँपस मध्ये, तो रपरपत होता पूर्वीसारखाच. तोच आवाज.. त्याच हाका, तेच आर्त बोलावणे. मला आधी ओळखच पटेना. अरेच्चा हा इथे कसा. चेहरा तर ओळखीचा वाटतोय. आवाजपण नेहेमीचाच. नाही.. नाही.. पण जरा जपून रहायला पाहिजे, ह्या परक्या देशात, कुणाचा भरवसा धरावा. कुणी तोतया पण असेल...छे छे नकोच ते.. असं म्हणून मी मान वळवून कामात लक्ष घातलं.. अरे अरे.. असा आत काय येतोस.. मी नाही तुला ओळखत.. थांब थांब.. महत्वाचे कागद आहेत ते..
पुन्हा तीच रपरप.. तोच तडमताशा.. तेच चेहरयावर उडालेले दोन थेंब.. अरे खरच तो ‘तू’ आहेस... आयला.. तू.. इथे
साल्या.. मी दोन महाखंड पार करून पोटासाठी इथे आलोय.. सतत तळमळतोय कुणीतरी ओळखीचं भेटावं म्हणून.. आणि तू माझ्यासाठी इथे आलास..
काय बोलू.. काय सांगू.. कसं सांगू तू कोण आहेस आत्ता माझ्यासाठी.. आत्ता, या क्षणी मला भिजवच गड्या.. चिंब होऊ दे मला.. तू मला भिजव.. मी तुला भिजवतो.. माझ्या अश्रुंनी..

लख्ख

लेकराला मायेच्या ह्या मायेची तहान
मायेनेच दिला सूर, उजळाया रान
आजीच्या कवतिकाचा सोनियाचा तोडा,
आईच्या पदराचा आधारही थोडा
मायेच्या गावाला या नाहीच किनारा
मऊशार पंखाखाली साजिरा निवारा.
थोडी आभाळात आता नवी दिशा दिसे.
नव्या क्षितिजाचे मला लागलेले पिसे.
नव्या नव्या पंखाना या भरारीची आस
कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास
खोलखोल दरी आणि माणसे निश्चेत
प्रेमानेच सावरले पुन्हा घेऊन कवेत
मायेनेच दिले लख्ख, मायेनेच प्राण
मायेचाच ठेवा आता, नाही काळा क्षण

स्वप्नधुंद

मनाच्या खोल कोपरयात दडलेले काहीबाही...
नकळत वर येते, जाणवतही नाही...
खळखळून हसणं, जागवलेल्या रात्री, उबदार गप्पा..
आणि बोलून बोलून लागलेली भूक.
कधीतरी कशाचातरी धरलेला राग....
मनाच्या कोपऱ्यातला इवलासा वण...
मीच बरोबर होतो तेव्हा... हेका अजून ...
मलाच नाही पटत.., तरी खोटा प्रयत्न.
निसटून गेले क्षण, एका बेसावध क्षणी...
उरतो आता केवडा, आणि चुकार एखादा मणी...
आतून आतून येते हाक, मोहरता सुगंध...
गंधांच्या शय्येवर, रात्र स्वप्नधुंद..

बाजीप्रभूंचा पोवाडा – पावनखिंड बलिदानाचा आज ३५०वा स्मृतीदिन – तेजोनिधी सावरकर

१२ जुलै १६६० च्या रात्री महाराज, बाजीप्रभू आणी सहाशे मावळे जीवावर उदार होऊन, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर पडले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
या प्रसंगावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात, स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. तो पोवाडा आज आपल्यासाठी देतो आहे. काही ठिकाणी तत्कालीन भाषा थोडी साधी करून घेतली आहे, हे काव्य समजायला सोपं आणि भाषा सहज असल्यामुळे रसग्रहण केलेल नाहीये. तरीही काही शंका आल्यास अवश्य विचारा..
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदासुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे ।
जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा ।
अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला । परस्पर वदला ।
अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे आजी ।
फिर लढना क्यौंकर आजी ।
चलो शराब उडायें ताजी ।
आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी ।
झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
गुंगवुनी अरि-सर्प शिवा गारुडी गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला । हटविणें त्याला ।
रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील ।
काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
‘अब्रह्मण्यम्’ कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥
साप विखारी देश-जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि भुलवुनि ठकवुनी कसाही ठेचावा ॥
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् । तथैव; श्रीमान् ।
भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें ।
रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला |
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या । करुनियां वाया ।
स्वातंत्र्य-कृष्ण-चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं ।
गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित ‘दीन’ शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला । म्लेंछ हा हटला ।
चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला ।
निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥
त्या बाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना । भो जनार्दना ।
लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे ।
हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।तोलुनी धरिला ।
रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा ।
घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काली । मर्मिं ती शिरली ।
श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती तत्क्षणी उठला ।
बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची । खिंड लढवावी ।
फेडाया ऋण या भूचें ।
अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें ।
व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।हास्य मुख केलें ।
हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा निजधर्माचा ।
हा तिसरा निजदेशाचा ।
हा चवथा कर्तव्याचा |
बार पांचवा धडाडला हर बोला ज्या झाला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती । आपुल्या रथीं ।
गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती ।
श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथे ॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी? ॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
- पोवाडा समग्र सावरकर साहित्य खंड – ८ मधून साभार.
मूळ पोवाड्यात एकुण १८ चौक (चरण) आहेत, मी फक्त १४ चौक लिहिले आहेत.
हेच काव्य आंतरजालावर काही ठिकाणी उपलब्ध आहे पण, बराच पाठभेद असल्यामुळे मी छापील प्रत, मूळ मानली आहे. काही मोजक्या ठिकाणी आजच्या काळात प्रचलित असणारे पण छंदवृतात बसणारे पर्यायी शब्द घातले आहेत.

मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीची आज शताब्दीपुर्ती - विशेष लेख - तेजोनिधी सावरकर

तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.
सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्‍याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.
हिंदुस्थानच्या किनार्‍याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्‍यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्‍याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्‍यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.
काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.
रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.
पहाट होत होती, पहार्‍यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.
बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.
त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्‍याकडे जाऊ लागले.
बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्‍यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.
आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्‍यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्‍यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्‍यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.
ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्‍यालाच कुणी जाळू शकेल काय...
तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्‍यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “
या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”
यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्‍याबरोबर हात बांधूनच.
अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्‍यात

स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता.  शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार

खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

तेजोनिधी सावरकर - लेख ३ - जीवनपट २

इंग्लंडच्या बोटीतून उतरून ट्रेनच्या डब्यात बसल्या क्षणीपासून इंग्रज गुप्तहेरांचा पहारा होताच, ती ट्रेन लंडनच्या स्टेशनांत घुसताच सावरकर धरले गेले, ह्याच प्रसंगी त्यानी माझ्या मागच्या लेखात वर्णन केलेली माझे मृत्युपत्र हे काव्य लिहिले. सगळीकडे बातम्यांचा, अफवांचा गदारोळ उडाला, जगातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात हि बातमी झळकली ह्यावेळेपर्यंत त्यांना आपल्याला अटक कुठल्या गुन्ह्यासाठी केलेली आहे हे ही माहीत नव्हते. तिथल्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सावरकरांना परत भारतातल्या कोर्टापुढे पाठवायचे ठरले. कारण भारतातल्या कोर्टापुढे विनाविलंब फाशी किंवा जन्मठेप देता आली असती. त्यांना नेणारे जहाज यदाकदाचित फ्रेंच किनारयाला लागलेच तर, झटपट हालचाल करून वैध वा इतर धाडसी मार्गाने सुटकेची योजना तयार होतीच. म्हणूनच कदाचित कुठल्याही राष्ट्रीय बंदराला न लागता थेट भारतात पाठवण्यासाठी अनेक बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कडेकोट बंदोबस्तात तात्याराव जहाजावर चढवले गेले.
जहाज मार्सेलिस बंदराजावळून जात असता मोठ्या धाडसाने जहाजाच्या पोर्ट होल मधून उडी मारून तात्याराव कसे पळाले ह्यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे. फ्रेंचांच्या स्वतंत्र भूमीवर एका अनधिकृत प्रवेश केलेल्या तरुणाला फ्रेंच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी होती. पण त्यांना परत इंग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या अपेशी काळरात्रीची कथा लेखमालेचा एक सुरस भाग ठरावी हे उचितच. उर्वरीत प्रवास अत्यंत सशस्त्र कडेकोट पहाऱ्यात होऊन शेवटी मातृभूमीस पाय लागले.
पण मार्सेलिसचे साहस अगदीच वाया गेलेले नव्हते, तिकडच्या काही अभिनव भारताच्या सदस्यांनी आपले वजन वापरून, दबाव इतका वाढवला कि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावे असे फ्रेंच सरकारचे पत्र येऊन पोचले, इंग्लंड व फ्रेंच सरकारचे राजकीय संबंधात वितुष्ट येते कि काय इतका तणाव वाढला. हे प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोपवावे लागले. इकडे हिंदुस्थानात त्यांच्यावरचा खटला सुरु होण्यापूर्वीच गडबडीने एक कायदा पास करून घेतला, ‘स्पेशल ट्रायब्युनल’ असे त्याचे नाव, ह्या कायद्याप्रमाणे सरकाने नेमलेल्या तीन जज्जांना अपिलाशिवाय फाशी देण्याचा अधिकार मिळाला. वा रे न्याय, एका आरोपीसाठी नवीन कायदा.
या खटल्यातील किस्से एका स्वतंत्र लेखासाठी राखून ठेवत आहे, तर अशा सगळ्या जामानिम्यात, तारीख २३ डिसेंबर १९१० उजाडली, कोर्टाच्या कामाकाजात न्यायाधीशांनी सावरकरांचे नाव घेऊन सांगितले “ तुम्हाला फाशीच व्हायची पण आम्ही आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा सांगतो !! “ सावरकर अर्धे उठले, ताठ मानेने गरजले ‘वंदे मातरम’
आजन्म ह्याचा कायद्याच्या भाषेतला अर्थ आयुष्यातली उमेदीची वर्षे – २५ वर्षे, पण लगेच त्याच पुराव्याखाली दुसरा खटला भरण्यात येऊन सावरकरांना त्याही खटल्यातली शिक्षा सुनावली गेली, अजून एक जन्मठेप म्हणजे ह्या २६ वर्षाच्या तरुणाला एकूण शिक्षा झाली ५० वर्षे.
माझे डोळे आत्तासुद्धा भरून येत आहेत, हे लिहिताना.... वयाच्या २६व्या वर्षी मला कसली अक्कल होती? कसले वेड होते? आणि हा तेजस्वी तरुण कुठल्या ध्येयासाठी हसत हसत बळी जात होता.
हा तेजोनिधी प्रकाशगोल कारागृहाने १९१० साली असा गिळला, तो दिव्य प्रकाश जगाला पुन्हा पहायला मिळाला १९२४ साली. लक्षपटीने अधिक तेजपुंज होऊन. या कारागृहातील काळावर लिहिलेली ‘माझी जन्मठेप’, तेथील जागृतीचे, शुद्धीचे, शिक्षणाचे कार्य यावरही वेगळे ३-४ लेख अवश्यच आहेत. ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची राजकारणात भाग न घेणे व जिल्ह्याबाहेर न जाणे ह्या दोन अटींवर सुटका करण्यात आली.
आता प्रकाटकार्य वेगळे होते, आता त्यांनी हातात घेतला तो सामाजिक सुधारणांचा प्रश्न. अस्पृश्यतानिवारण, जातीभेद विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा विरोधी लेखन, व्याख्याने या सगळ्या बाजूने त्यांनी रान पेटवून दिले. रत्नागिरीत पतीतपावन मंदीर स्थापन केले.
क्रमशः
या लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील

तेजोनिधी सावरकर - लेख २ -जीवनपट १

इंग्लंडच्या बोटीतून उतरून ट्रेनच्या डब्यात बसल्या क्षणीपासून इंग्रज गुप्तहेरांचा पहारा होताच, ती ट्रेन लंडनच्या स्टेशनांत घुसताच सावरकर धरले गेले, ह्याच प्रसंगी त्यानी माझ्या मागच्या लेखात वर्णन केलेली माझे मृत्युपत्र हे काव्य लिहिले. सगळीकडे बातम्यांचा, अफवांचा गदारोळ उडाला, जगातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात हि बातमी झळकली ह्यावेळेपर्यंत त्यांना आपल्याला अटक कुठल्या गुन्ह्यासाठी केलेली आहे हे ही माहीत नव्हते. तिथल्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सावरकरांना परत भारतातल्या कोर्टापुढे पाठवायचे ठरले. कारण भारतातल्या कोर्टापुढे विनाविलंब फाशी किंवा जन्मठेप देता आली असती. त्यांना नेणारे जहाज यदाकदाचित फ्रेंच किनारयाला लागलेच तर, झटपट हालचाल करून वैध वा इतर धाडसी मार्गाने सुटकेची योजना तयार होतीच. म्हणूनच कदाचित कुठल्याही राष्ट्रीय बंदराला न लागता थेट भारतात पाठवण्यासाठी अनेक बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कडेकोट बंदोबस्तात तात्याराव जहाजावर चढवले गेले.
जहाज मार्सेलिस बंदराजावळून जात असता मोठ्या धाडसाने जहाजाच्या पोर्ट होल मधून उडी मारून तात्याराव कसे पळाले ह्यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे. फ्रेंचांच्या स्वतंत्र भूमीवर एका अनधिकृत प्रवेश केलेल्या तरुणाला फ्रेंच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी होती. पण त्यांना परत इंग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या अपेशी काळरात्रीची कथा लेखमालेचा एक सुरस भाग ठरावी हे उचितच. उर्वरीत प्रवास अत्यंत सशस्त्र कडेकोट पहाऱ्यात होऊन शेवटी मातृभूमीस पाय लागले.
पण मार्सेलिसचे साहस अगदीच वाया गेलेले नव्हते, तिकडच्या काही अभिनव भारताच्या सदस्यांनी आपले वजन वापरून, दबाव इतका वाढवला कि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावे असे फ्रेंच सरकारचे पत्र येऊन पोचले, इंग्लंड व फ्रेंच सरकारचे राजकीय संबंधात वितुष्ट येते कि काय इतका तणाव वाढला. हे प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोपवावे लागले. इकडे हिंदुस्थानात त्यांच्यावरचा खटला सुरु होण्यापूर्वीच गडबडीने एक कायदा पास करून घेतला, ‘स्पेशल ट्रायब्युनल’ असे त्याचे नाव, ह्या कायद्याप्रमाणे सरकाने नेमलेल्या तीन जज्जांना अपिलाशिवाय फाशी देण्याचा अधिकार मिळाला. वा रे न्याय, एका आरोपीसाठी नवीन कायदा.
या खटल्यातील किस्से एका स्वतंत्र लेखासाठी राखून ठेवत आहे, तर अशा सगळ्या जामानिम्यात, तारीख २३ डिसेंबर १९१० उजाडली, कोर्टाच्या कामाकाजात न्यायाधीशांनी सावरकरांचे नाव घेऊन सांगितले “ तुम्हाला फाशीच व्हायची पण आम्ही आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा सांगतो !! “ सावरकर अर्धे उठले, ताठ मानेने गरजले ‘वंदे मातरम’
आजन्म ह्याचा कायद्याच्या भाषेतला अर्थ आयुष्यातली उमेदीची वर्षे – २५ वर्षे, पण लगेच त्याच पुराव्याखाली दुसरा खटला भरण्यात येऊन सावरकरांना त्याही खटल्यातली शिक्षा सुनावली गेली, अजून एक जन्मठेप म्हणजे ह्या २६ वर्षाच्या तरुणाला एकूण शिक्षा झाली ५० वर्षे.
माझे डोळे आत्तासुद्धा भरून येत आहेत, हे लिहिताना.... वयाच्या २६व्या वर्षी मला कसली अक्कल होती? कसले वेड होते? आणि हा तेजस्वी तरुण कुठल्या ध्येयासाठी हसत हसत बळी जात होता.
हा तेजोनिधी प्रकाशगोल कारागृहाने १९१० साली असा गिळला, तो दिव्य प्रकाश जगाला पुन्हा पहायला मिळाला १९२४ साली. लक्षपटीने अधिक तेजपुंज होऊन. या कारागृहातील काळावर लिहिलेली ‘माझी जन्मठेप’, तेथील जागृतीचे, शुद्धीचे, शिक्षणाचे कार्य यावरही वेगळे ३-४ लेख अवश्यच आहेत. ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची राजकारणात भाग न घेणे व जिल्ह्याबाहेर न जाणे ह्या दोन अटींवर सुटका करण्यात आली.
आता प्रकाटकार्य वेगळे होते, आता त्यांनी हातात घेतला तो सामाजिक सुधारणांचा प्रश्न. अस्पृश्यतानिवारण, जातीभेद विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा विरोधी लेखन, व्याख्याने या सगळ्या बाजूने त्यांनी रान पेटवून दिले. रत्नागिरीत पतीतपावन मंदीर स्थापन केले.
क्रमशः
या लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील

तेजोनिधी सावरकर - लेख १ - माझे मृत्युपत्र

तेजोनीधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज.
सावरकर ह्या तेजोनिधी विषयी अनेकांनी आपली लेखणी आणि जीभ सतत गेली ५०-६० वर्ष चालवुन देखील हा 'सुर्य कोटी समः प्रभा' अजुन आवाक्यात येत नाही. तात्यारावांचे विचार मला समजले तसे तुमच्यापुढे मांडावेत आणि मांडता माडता मलाच ते जास्त कळावेत ह्या स्वार्थी विचाराने मी ही तात्यारावांच्या वरील लेखमाला चालु करत आहे. तात्यारावांच्या बद्दल काहिही लिहीताना, कुठे विसंगती आढळली तो दोष फक्त आणि फक्त माझाच समजावा.
ह्या मृत्युंजयाच्या 'दाहक परी संजीवक' अशा विचारांचा मागोवा घेताना, माझ्या लेखमालेच पहिलं पुष्प "माझे मृत्युपत्र" असावं हा योग यथोचीतच म्हणा.
१९१०च्या मार्च महिन्यामधे तात्याराव इंग्लंड मधे पकडले गेले तेव्हा त्यावेळच्या एकंदरीत परिस्थीतीनुसार पुन्हा त्याची त्यांच्या वहीनीशी भेट होणे अशक्यप्राय वाटत होते. तात्यारावांच आपल्या वाहिनीशी नातं लहानपणापासुन कीती हळवं होते ह्याविषयी नंतर संदर्भ येइलच, तर अशा अत्यंत पुजनीय वहीनीला आपल्या अटकेची कटु बातमी सांगण्याचं कठोर कर्तव्य करत असतानाच, आपण हातात घेतलेल्या कार्यातील उदात्त, दिव्य, श्रेयस मर्म विशद करणारं असं हे "माझं मृत्युपत्र" तात्यारावांनी लिहीलं.
त्यांनी लंडनमधल्या ब्रिक्स्टन जेलमधुन लीहिलेलं त्यावेळेला त्यांच्या जन्मातलं बहुदा शेवटचं ठरणार असलेलं हे काव्य.
( ह्या संपुर्ण काव्यात चार सर्ग आहेत, मी रसग्रहणासाठी शेवटचे दोन सर्ग घेतलेले आहेत. विवेचनात संदर्भासाठी पंक्तीक्रमांक टाकत आहे, रसभंग होणार नाही अशी अपेक्षा)
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, - १
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला . - २
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा - ३
त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. - ४
त्वत्स्थंडिलीं ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता - ५
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण पुण्यसिंधू - ६
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय 'बाळ' झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला - ७
हें काय! असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी - ८
संतान ह्या भरतभूमिस तीस कोटी, जे मातृभक्ति-रत सज्जन धन्य होती. - ९
हे आपुले कुलही त्यामधि इश्वरांश, निर्वंश होउनी ठरेल अखंड-वंश - १०
की ते ठरोंही अथवा नठरो परंतू , हे मातृभू अम्ही असो परिपुर्ण-हेतू - ११
दिप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ - १२
ऐसें विसंचुनी अहो वहिनी! व्रतांते, पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेते - १३
श्रीपार्वती तप लरी हिमपर्वतीं ती, की विस्तवात हसल्या बहु राजपूती - १४
तें भारतीय अबला-बलतेज कांही, अद्यापि ह्या भरतभूमींत लुप्त नाही - १५
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र, वीरांगने तव सुवर्तन हो समग्र - १६
माझा निरोप तुज येथुनी हाच देवी, हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेंवी - १७
सप्रेम अर्पण असो प्रणतीं तुम्हांते, आलिगन प्रियकरां मम अंगनेतें. - १८
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें, - १९
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे. - २०
हे मातृभूमी, आतापर्यंत माझे मन, बुद्धी कविता, लेखन, वक्तृत्व हे सगळं फक्त तुझ्याच कारणी लावलं आहे, ह्या सगळ्यातुन फक्त तुझंच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे -------- १,२
तुझं कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारं पवित्र कर्तव्य , आणि तीच इश्वरसेवा मानुन आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही, मित्रवर्ग तुलाच अर्पण केले, माझे स्वतःच्या तारुण्यसुलभ यौवनलीला स्वतःच्या हातानी जाळुन भस्म केल्या केवळ तुझ्यासाठीच. --------- ३,४
तुझ्याच पुजेमधे माझे घर, पैसा, संपती अर्पण केली, माझा लहान मुल, माझी पत्नी आणि वहीनी, तुझ्या सेवेच्या वणव्यातच ढकलुन दिली. तुझ्या अग्नीमधे माझा अतीधैर्यवान मोठा भाउ आणि माझा लहान भाउ 'बाळ' ह्याचीही आहुती दिली. व आता माझा देहही मी त्याच यज्ञामधे समर्पण करत आहे.-------- ५,६,७
पण ह्यात मोठे ते काय, आम्ही जरी सात भाउ जरी असतो, तरी आम्ही सर्व तुझ्याच सेवेत बलिदान करुन कृतार्थ झालो असतो. कारण हे मातृभू तुझ्या तीस कोटी संतानापैकी जे कोणी तुझ्यासाठी बलीदान करतात त्यांचच आयुष्य सार्थकी लागतं. आणि आपला हा वंश सुधा त्या उदात्त इश्वरकार्यासाठीच निर्वंश होउनही अमर ठरेल. -------- ८,९,१०
आणि अस नाही झालं तर? तरीही खंत नाही. आम्ही मात्र आता संपुर्ण समाधानी आहोत, तुझ्या उद्धारासाठी, ह्या पवित्र कर्तव्यासाठीच आम्ही ह्या वणव्यात आमाचा स्वार्थे जाळुन केव्हाच कृतार्थ ठरलो आहोत. -------- ११,१२
तेव्हा हे लक्षात ठेउन माझे प्रिय वहिनी, आता तुम्हालाही या पवित्र कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. तुम्हीही हिमालयावर जगादोद्धारासाठी तप करणार्‍या त्या पार्वतीप्रमाणे, अथवा स्वधर्मरक्षणासाठी हसत हसत ज्वालाजोहार करणार्‍या रजपुत स्त्रियांच्या प्रमाणे धिराने हे कर्तव्य करुन आपल्या वंशाचा उद्धार कराल.-------- १३,१४
तुमच्या ह्या अतीधैर्यशील व्रतपालनाने ते दिव्य भारतीय स्त्रियांचे तेज अजुनही ह्या देवभूमीत जागें आहे हेच सिद्ध होइल. -------- १५,१६
बाकी काय सांगावे, वहिनी - हाच माझा शेवटचा निरोप समजा, तुमच्या चरणावर डोकं ठेउन वंदन करणार्‍या ह्या तुमच्या मुलाला आषीर्वाद द्या. माझ्या लाडक्यांना आणि माझ्या पत्नीलाही हाच माझा शेवटचा संदेश. --------१७,१८
कारण आम्ही आंधळेपणाने हा निखार्‍यांचा मार्ग चोखळला नाहिये, आमच्या जाज्वल्य इतीहासाला आणि निसर्गदत्त कर्तव्याला साजेसंच असं हे दिव्य, दाहक, पवित्र कर्तव्य आम्ही सर्व विचाराअंतीच जाणतेपणानेच तर स्वीकारलय. -------- १९,२०
ह्या दाहक आणि करुण काव्यावर माझ्या क्षीण लेखणीतून कोणतेही भाष्य करण्याचा वेडा प्रयत्न मी करणार नाही, अर्थानं स्वयंसीद्ध अस हे काव्य केवळ संधी सोडवुन आणि थोडयाश्या सोप्या स्वरुपात मांडुन इथेच थांबतो...

Monday, June 21, 2010

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग ३ अंतीम

अंक दुसरा.
माणुस तणावपुर्ण वातावरणात आनंद वाठारकर ला फोन करुन बोलावतो आणि देशमुख व चौधरी चपापतात, इथे पहिल्या अंकाचा पडदा पडतो..
दुसरा अंक सुरू होताना हाच प्रसंग पुढे चालू होतो. आपल्याला हळुहळू पण ठामपणे हे पटतय की माणुस हा कुणी माथेफिरु वा चिडखोर गृहस्थ नसुन, त्याने एका प्रकरणाचा पद्धतशीर अभ्यास करुन, पुर्ण तयारीनीशी तो ह्या संघर्षात उतरला आहे. कारण आजच्या जनतेला भेटण्याच्या देशमुखांच्या अपॉइंट्मेंटच्या वहीमधे पुढचे नाव वाठारकरचं आहे. आता हे सगळं हाताबाहेर जातय हे लक्षात आल्यावर देशमुख तब्येतीचं कारण पुढे करुन, माणसाला कटवण्याचा प्रयत्न करतात, पण माणसाकडे असलेले सज्जड पुरावे आणि त्याची चिकाटी, देशमुखांना आणि चौधरींना आपल्या जागी खीळवुन ठेवते, आणखी एक प्रमुख कारण आहे, देशमुखांना मिळणार असलेलं मंत्रीपद. ह्या संभाषणातच, माणसाची भुमीका स्पष्ट होउ लागते
देशमुख - हे इतकं ओरडुन सांगायला नको?
माणुस - ओरडल्याशीवाय प्रामाणिक माणसानं जगायच कस? जो माणुस फक्त स्वत:चा विचार करत नाही, दुसर्याच्या दु:खाच निवारण करणं हाच ज्याच्या जिवनाचा अर्थ आहे अशा माणसानं जगायचं कसं? होय माझ्या पोटात ढवळल्यासारखं होतं. ह्या क्षणीसुद्धा मला मळमळायला लागलं आहे. माझ्या हातुन एवढच होण्यासारखं आहे. माणसांनी काय फक्त आपल्यापुरतंच पहावं
देशमुख - शांत व्हा .. शांत व्हा..
माणुस - मला घाणेरडा म्हणु नका! कोणी केली ही घाण? ही तुम्ही केलेली घाण आहे!
चौधरी पुन्हा हे सगळ प्रकरण आपल्या पातळीवरुन तोलुन पहायचा, अंदाज घ्यायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या प्रयत्नांना पहिल्यांदाच यश येताना दिसतं. माणसाच्या बरोबर आलेली चित्रा, ही वाठारकरची बायको आहे ह्याचा पहिल्यांदाच उलगडा होतो. पत्रकार वाठारकर, ह्यानं देशमुखांच्या कामाच्या पद्धतीविषयी एक लेख लीहिला होता तो, देशमुख व चौधरींनी दाबुन टकला, व त्याचा परिणाम वाठारकरची नोकरी जाण्यात झाला. हे अस्वस्थ करणारं सत्य आपल्याला समजतं. वाठारकर त्यामुळे दारुच्या आहारी गेला, ह्याचाही उलगडा होतो. आणि चौधरी आपली पुढची खेळी करतात, माणसाशी अजीबात न बोलता, ते चित्राला सर्व काही नीट करण्याच आमिष दाखवतात. इतक्या दारुण परीस्थीतली चित्रा, वाठारकरची नोकरी, घर, त्याची व्यसनमुक्ती, सर्वोत्तम डॉक्टरकडुन उपचार ह्या सगळ्या प्रलोभनामुळे प्रथमच कोसळ्ते. चौधरींच्या प्रस्तावाला होकार देते, आणि माणसाला प्रचंड धक्का बसतो. पण चित्राचे हे कोसळणं क्षणभराचं असतं. तो आवेग ओसरल्यांनंतर ती आपल्या मुळ विचाराशी प्रतारणा न करता, माणसाच्या बरोबर ठामपणे उभी राहाते.
चौधरी - (माणसाला)तुम्ही समजता कोण स्वतःला? हे सगळं पैसे मोजुन भाड्यानं बोलायला आणलय तुम्हाला..
चित्रा - खबरदार यांच्याविषयी असं बोलाल तर.. अत्यंत प्रामाणिक गृहस्थ आहेत हे..
चौधरी - मला हे प्रकरण मिटवायच आहे.. पण हे गृहस्थ...
चित्रा - स्वतःला भाड्यानं विकणारे नाही हे.. जगात सगळीच माणसं यांच्यासारखी असती तर...
पण आपल्याला प्रथमपासुनच आत कुठेतरी सतत जाणवतंय की हा संघर्ष चौधरी आणि माणसातला नाहिये, तो चित्रा आणि चौधरी यांच्यातलाही नाहिये. हा संघर्ष आहे माणुस आणि देशमुख यांच्यामधला. किंवा कदाचित देशमुख आणि देशमुख यांच्यातलाच खरंतर.
माणुस - ठिक आहे, मी आता तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, इथे येताना मी वाइटातल्या वाईट परिणामाला तयार होतो. पण आपल्या चर्चेमुळे मला खुप समाधान वातलं. मी तुम्हाला बोलायला भाग पादलं, एवढच नव्हे तर सौदाही करायला लावला. आता मला केव्हाही इथुन निघुन जाता येइल. मला कोण दोश देणार? मी? वाठारकर? चित्रा? तुम्ही? डॉ. चौधरी तर आनंदाने उड्या मारतील. पण माझ्याहिषेबी ते नसल्यासारखेच आहेत. एखाद्या मेलेल्या माणसासारखे आहेत ते मला...
चौधरी - (हसतात) होय! ठार मेलेला!
माणुस - पण डॉक्टरसाहेब तुम्ही.. तुम्ही निराळे आहात. आता फक्त तुम्ही आणि मीच, मी इथुन गेल्यावर तुम्ही गाडी नाही बोलावणार. तुमच्या ह्या स्वीय सहकार्यांना घरी जायला सांगणार आणि इथे एकटेच राहाणार.
चौधरी - मला कंटाळा आलाय ह्या बडबडीचा
माणुन - (चौधरींच्या बडबडीकडे अजिबात लक्ष न देता) आणि मग तुम्हाला मनःशांती लाभाणार नाही. तुम्ही उदास व्हाल. स्वतःवरच चिडाल.. तोंडात एक विचित्र चव आल्यासारखी वाटेल तुम्हाला. तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे काय झालं? हा कोण होता? मला गुन्हेगार ठरवायला आला होता? माझा आत्मा हिरावुन न्यायला आला होता? तो म्हणजे ज्या काळात मी एक उपाशीपोटी ब्शिकणारा पण अत्यंत निर्मळ मनाचा कॉलेजविद्यार्थी होतो तो तर नव्हता तो? मग मी त्याला लाथ मारुन बाहेर का हाकललं? मी त्यालाच असं का नाही म्हणलं " मीनिट्भर थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे, न जाणो तु योग्य वेळीही आला असशील...."
आणि मग चौधरींची केविलवाणी धडपड लहान लहान होत जाते, माणुस आणि देशमुख यांचे अर्थगर्भ शब्द मोठे होत जातात. सुरु होतो एक अखंड संवाद. सतत झंकारणारा, शांत स्वर. विवेकाचा संवाद विचारांशी, आणि विचांरांचा संघर्ष विवेकाशी. ह्या ४-५ पानांमधे भाई इतकी प्रत्ययकारी वाक्यं लिहुन जातात की नाटकातली पात्र बाजुला राहुन आपलाच संवाद सुरु होतो एकेक्षणी, आपल्याच विवेकाशी. देशमुख शाश्वत सत्याच्या जवळ पोहोचतायत अस वाटत असतानाच, चौधरी आपली अप्रतीम इहवादी भुमिका वाटतात, क्षणभर ती आपल्याला पुर्ण पटतेही, पण पुढच्याच क्षणी माणुस त्यातला फोलपणा उलगडुन दाखवतो, एखाद्याच वाक्यात कारण माणुस जे काही बोलतो त्याला अत्यंत तर्कनीष्ठ विवेकाचं पाठबळ आहे..
आता आपल्यापुढे कसलाही गुंता नाहिये, आपल्यापुढे सरळसरळ दोन मार्ग आहेत, एक देशमुखांचा अर्थात माणसाचा आणि दुसरा चौधरींचा. ह्यापुढचं नाट्य आत्तापर्यंतच्या सगळ्या नाट्यविषयावर कडी करणारं आणि धक्कातंत्राचा सर्वोच्च शिरोबिंदू गाठणारं आहे.....
पण आत्ताच त्याविषयी लिहीणं योग्य होणार नाही.. ह्या नाटकातलं नाट्य सगळाच गौप्यस्फोट करुन गमावण्याइतका मी करंटा नाही, ह्या लेखाच्या मागच्या भागाच्या प्रतीक्रियांतुन काही जणांनी आपण नाटक वाचणार असल्याचं कळवल आहेच.. तेव्हा त्या रसभंगाच पाप माझ्या नावावर नको..

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग २

अंक पहिला -
ह्या नाटकामधे पात्रे चारच आहेत डॉ. देशमुख, डॉ. चौधरी, माणुस, व चित्रा, पण संवादामधे इतारही काही महत्वाची पात्रे येउन जातात उदा. डॉ. कृष्णमुर्ती, वाठारकर, पेंडसे वगैरे.
ह्या अंकाच्या सुरुवातीलाच देशमुख त्यांच्या बायकोशी फोनवर बोलताहेत, तिला त्यांचे गुरू डॉ. कृष्णमुर्ती ना विमानतळावर रिसीव्ह करण्याविषयी सुचना देताहेत, ह्या काही संवादांमधुन आपल्याला देशमुखांचा करडा काटेकोर, व कर्तव्यतत्पर स्वभाव दिसतो. देशमुख आत्ता उपमंत्री आहेत व लवकरच आरोग्यमंत्री होणार आहेत, आत्ताची सहा ते आठ ही वेळ त्यांच्या जनतासंपर्काची आहे, त्यांचे सहाय्यक डॉ चौधरी भेटायला आलेल्या लोकाना केबिनमधे बोलावतात 'माणुस' व चित्रा प्रवेश करतात, ह्या क्षणापासुनच 'माणुस' आपला वेगळेपणा कुठलेही वेगळे संवाद न म्हणता पण ठळकपणे जाणवुन देतो. माणसाला संवादाला सुरुवात करायची आहे पण तो घुटमळतोय, देशमुखच त्याला बोलायला उद्युक्त करतात.
माणुस: (सर्व शक्ती गोळा केल्यासारखं) ठिक आहे, मी इथे आलोय असं सुचवायला की हे आपण सोडून द्या..
देशमुख: मी सोडून देऊ? काय सोडून देऊ? माझ्या नाही लक्षात येत काय सोडून देऊ?
माणुस: (खंबीरपणाने) आपले उपमंत्रीपद.
ईथे नाटकात ताण निर्माण व्हायला सुरूवात होते, देशमुख आधी चिडतात, उखडतात, नंतर डॉ चौधरी आपल्या पद्धतीने माणसाला हाताळू पाहतात.
चौधरी: तुम्ही काय जनतामंचाचे कार्यकर्ते आहात की काय? का कुठल्या चौकशी आयोगाचे सदस्य वगैरे? किंवा लोकनियुक्त प्रतिनिधी?. आहात कोण तुम्ही?
माणुस: हा.. हा.. आता आल लक्षात.... एक गंभीर सुचना करायला एक सामान्या माणुस इथे शिरतो.. याचा अर्थ.. याचा अर्थ हा की तो कोणीतरी बडा माणुस असला पाहिजे. आता आल माझ्या लक्षात.. अच्छा.. अच्छा.. त्या अर्थाने मी नगण्य माणुस आहे.
त्यानंतर संभाषणा चालु असताना त्या माणसाच्या हेतुबद्दल आपली उत्सुकता वाढतच जाते. ह्या सगळ्या संवादांमधुन पुलंनी नाटकाचा वेग तसुभारही कमी न होता एक रहस्यमय छटा सगळ्या संवादांवर कायम ठेवली आहे. माणसाच्याच बोलण्यातुन आपल्याला देशमुखांचा पुर्वेतीहास, त्यांचे आणि चौधरींचे पुर्वीपासुन बरोबर असणे, त्यांचे हृदयविकार केंद्र, तिथले देशमुखांचे स्थान असा सगळा पट उलगडू लागतो संभाषण थोडे हलकफुलक होतानाच 'आनंद वाठारकर'चा उल्लेख येतो आणि क्षणभर ह्या सगळ्याच्या पलिकडे असणार्‍या खर्‍या गंभीर विषय लख्खकन चमकुन जातो. चौधरी बेरकी आहेत त्यांना सगळे आठवतय पण ते सराईतपणे सगळ विसरल्याचा आव आणतायत.
नंतर माणुस सतत एकामागुन एक पुरावे, पत्रे, आरोप ह्यातुन असह्य दबाव निर्माण करतो, त्यावेळेला पुलंच्या लेखणीचे कौतूक वाटते. तो सगळा संघर्ष अजिबात आक्रस्ताळे पणा न करता केवळ तापमापकाची भुमिका घेउन ते वर्णन करतात, आपल्याला मात्र तो ताण असह्य होतो.
आता देशमुखांना आरोप कळाला आहे, पण त्यांची प्रतिष्ठा, पद त्यांना तो स्विकारु देत नाहिये, मग ते त्या हृदय्विकारकेंद्रात आपण घेतलेले कष्ट, आपल्यावरच्या जबाबदार्‍या, त्यावेळची परिस्थीती ह्या सगळ्या कारणांमधुन स्वतःच्याच विवेकाशी प्रतारणा करत आहेत, अगदी त्याच पटलावर आपल्याला चौधरींच्या प्रतिक्रियेचा कॉट्रास्ट स्पष्ट दिसतो. चौधरींना त्यांच्या विवेकाशी लढायचच नाहिये, त्यांना लढायचय ते माणसाशी, त्या आरोपांशी, चौधरी त्या माणसावर, वाठारकरवर, निरर्गल आरोप करीत राहातात. ह्या संघर्षामधे देशमुखांचे व चौधरींचे दोन मार्ग आपल्याला मनापासुन पटतात, पण पुढच्याच क्षणी माणुस एखाद्याच वाक्याने त्या जस्टिफिकेशनच्या चिंध्या ऊडवुन देतो.
शेवटी खुप तणावपुर्ण प्रसंगानंतर माणुस हे आरोप खरेखोटे करण्यासाठी वाठारकर ला फोन करुन बोलावतात आणि सगळ्या नाटकाचा प्लॉट बदलतो, नाटक अधिक गंभीर वळण घेत आणि पडदा पडतो.
ह्या अंकाचे वैशीष्ठ्य म्हणजे, त्यातले वेगवान संवाद, छोट्या छोट्या संवादातुन निर्माण होणारा अपुर्व संघर्ष
क्रमशः

एक झुंज वार्‍याशी - पुलंचे नाटक - रसग्रहण - भाग १

एक झुंज वार्‍याशी हे पुलंच एक तुलनेन कमी लोकप्रिय नाटक, मी हे माझ्या महाविद्यालयीन आयुष्यातच वाचले, खरं सांगायचे तर तेव्हा झेपले नाही पण आपण काहीतरी अलौकीक वाचतोय याचा पुसटसा अंदाज नक्कीच आला. त्यानंतर अनेकवेळा हे नाटक वाचत गेलो आणि प्रत्येक वेळेला नविन, वेगळं उलगडत गेल.
हे खरंतर एक रुपांतरीत नाटक आहे, इथे रुपांतरीत हाच शब्द योग्य आहे कारण पुलं कधीही भाषांतर करीत नाहीत, केवळ भाषा वा लिपी न बदलता नाटकाची घटना, संघर्ष, पात्रे ईतकी बेमालुम उतरवतात की अगदी मुळ नाटक माहीत असेल तरी कुणाला शंकाही येउ नये कि ह्या कलाकृतीचा आत्मा अस्सल देशी नाहिये अशी, (अगदी हेच 'पिग्मॅलियन' संदर्भातही खरे आहे). 'झुंज'चा मुळ आधार म्हणजे "डोझोर्त्सेव' यांची 'द लास्ट अपॉइंट्मेंट' ही रशियन कलाकृती.
ह्या नाटकाला वरवर पाहता तसा काही खास विषयच नाहीये, पण ह्यातल्या संघर्षाची जातकुळीच वेगळी आहे. इथे पात्रे चारच, रंगमंचावर त्यांचे येणेजाणेही फारसे नाहीच, त्यामुळे पारंपारीक नाट्यगुणांचा तसा अभावच, पण दिलिप प्रभावळकर, सयाजी, सारखे कलाकार आणि वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शकामुळेच हे नाटक पेलले गेले
एक सामान्य माणुस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरुन राजिनामा मागतो, स्वत:वर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसर्‍या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तोही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेतच इतके नाट्य आहे की इतर कुणाच्या लेखणीतुन उतरताना ते मुळचे नाट्य कदाचीत झाकोळुन गेल असते पण, भाईंच्या लेखणीतुन तर ते पानोपानी फुलतच जाताना दिसते
हा अफाट लाव्हासंघर्ष ईतक्या संयतपणे पानापानातुन वाहताना पाहुन मी कित्येकवेळेला शहारुन गेलो आहे, अजुनही जातो.
'झुंज' चा घटनाकाळही २ तास आणि ह्या नाटकाचा कालावधीही २ तास पण दोन तास आपण इतक्या वेगवेगळ्या भुमीकांतुन फिरुन येतो, की मला वैयक्तिकरीत्या तरी हे नाटक वाचल्यानंतर खुप वैचारीक थकवा येतो.
एका प्रवेशात एक पात्र बोलत असताना आपल्याला त्याचे म्हणणे अगदी पुर्ण पटते, आपण अगदी नकळत मान डोलावतो, पण पुढच्याच क्षणी, दुसरे पात्र विचातशृंखला ऐकवतं आणि आपल्या काळजात चर्रर्र होते कि क्षणभरापुर्वी आपण किती राक्षसी विचार करत होतो हे जाणवुन, आणि हा विचारलंबक चालुच राहातो सतत, पडदा पडेपर्यंत.
वाचकालाच त्या नाटकातली चार पात्रे नकळतपणे करुन सोडणे, त्या व्यक्तीरेखेचा विचार जगायला लावणे, हेच मला वाटते ह्या नाटकाचं सर्वात मोठे बलस्थान,
हे नाटक मला झेपेल तेवढे उलगडुन दाखवायचा एक क्षीण प्रयत्न करणार आहे, वर्ण्यविषय एवढा अफाट आहे की क्रमश: ची मदत घावी लागणारच.
क्रमशः
माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी. माझा स्वभाव लहानपणी जरा बुजरा, अबोल होता, मला कसलातरी न्युनगंड असावा बहुतेक त्याकाळी, कारण मला ९वी-१०वीत जाइपर्यंत फार जवळच्या मित्र-मैत्रिणी नव्हत्या. आमच्या गल्लीत मुले दुपारी एकत्र जमुन क्रिकेट वगैरे खेळायची पण मला फारसं यायचच नाही, म्हणुन मी जायचो नाही तिकडे.
काय असेल ते असो मला अश्या कित्येक दुपारी एकट्यानेच, स्वतःशीच रमवलेल्या आठवतात ते ह्या अंगणात. आमच्या अंगणात वेगवेगळ्या दिवसात असंख्य प्रकारचे किडे असायचे. मी इतक्या एकाग्रतेनं त्यांचं निरीक्षण करण्यात रमुन जायचा, की मला घरातुन हाक मारलेलही कळायच नाही कित्येकदा, त्यात दुपारी ११ ते ४-४:३० हा वेळ म्हणजे खुप मस्त असायचा, जेवण, झाकपाक होउन शक्यतो सगळी मंडळी निवांत असायची, कुण्णाकुण्णाला माझी आठवण यायची नाही, उलट यावेळेत दंगा न केल्याबद्दल कृतज्ञताच वाटत असेल कदाचीत. आणि मग मी त्या माझ्या बालमती गुंग करणार्‍या छोट्या जगात हरवुन जायचो.
सर्वात जास्त आठवतात ती 'सुरवंट'. हिवाळ्यात पेरुच्या झाडावर सुरवंट फार, कधी कधी आंब्यावर पण असतात. बोट- अर्ध बोट आकाराची काळी, करड्या, भुर्‍या रंगाची सुरवंट हा एक मजेशीर प्रकार असतो. त्यांची चाल लयदार, एखाद्या अळीसारखी, पण त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान लय बघत रहावीशी वाटते. चौथी पाचवीत असताना ही सुरवंट आम्ही पाळायचो पण, म्हणजे पुर्वी जुन्या त्या 'होम' की काहीतरी नावाच्या मोठ्या काडेपेट्या यायच्या, त्याच्यामधे पेरुची, आघाड्याची वा झेंडुची पानं भरुन त्यात सुरवंट पकडुन ठेवायचो, सतत पाने घालत रहायला लागायचं, काही दिवसानी सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करुन घेतं, मग ती काडेपेटी त्या कोषासकट बाहेर ठेवायची एखाद्या दगडावर, आणि त्यातुन फुलपाखरु बाहेर यायची वाट बघायची. कधीच दिसलं नाही माझ्या डोळ्यासमोर फुलपाखरू बाहेर येताना, मग खुप हिरमुसला व्हायचो मी, पण नेहेमी मोकळे कोष मात्र दिसायचे. सुरवंट घरात आणलं की खुप शिव्या खाव्या लागायच्या पण कसतरी लपवुन मी ती काडेपेटी आणायचोच घरात. ह्यात कष्ट काहीच पडायचे नाहीत अस नाहीये बरका. सुरवंट जराजरी लागले हाताला वा कुठेही त्वचेला कि प्रचंड खाजायचं, जरा बारकाइनं पाहिलं तर कोवळ्या त्वचेत रुतून बसलेले केसही दिसतात, खुप आग होते. ह्यावर उपाय असायचाच, जिथे सुरवंट लागलय त्या त्वचेवर जाड घोंगड्याने घासल्यावर ते केस निघुन जायचे आणि आग कमी व्हायची, आणखी एक हमखास उपाय म्हणजे झेंडुची पाने कुस्करुन लावणे, थंड वाटायचे एकदम.
तिथल्या तुतूच्या झाडावर गोल रंगीबेरंगी चकचकीत किडे दिसायचे, त्यावेळेला आम्हाला बीट्ल नाव माहीती नव्हतं आम्ही टॅक्सीकिडे म्हणायचो त्याला.
गवळण कीडा कधीमधीच दिसायचा, मात्र पानगळीच्या दिवसात काडीकीडा मात्र नेहेमी बघितलाय. वाळलेल्या पानात तो कीडा पायाखाली येउ नयी म्हणुन वाकुन चालायचो, शोधत शोधत.
पावसाच्या दिवसात तर ते सगळे नवं जग बघताना भानच रहायचं नाही, असंख्य प्रकारचे बेडुक ओरडायचे. एखादा बेडुक उडी मारुन कुठे जातोय त्याचा नजरेने पाठलाग करायचा, मग एखादा दुसराच बेडुक दिसायचा क्षणभर, आणि पहिला हरवुन जायचा. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागच्या दाराला आम्ही एक लाकडी फळी बसवायचो आडवी, बेडुक येउ नयेत म्हणुन, पण तरी एखादा घरात शिरलाच तर त्याला झाडु घेउन बाहेर हाकलायची मोठ्ठी जबाबदारी माझ्यावरच. आत्तासुधा हे लीहीत असताना त्यांचा तो खर्जातला गलका माझ्या कानात तस्साच आहे. ते डराव डराव चं समुहगीत ऐकून आता किती वर्ष झाली कुणास ठाउक.
ह्याच दिवसात यायच्या त्या गोगलगायी. चालताना पायाखाली एखादीजरी गोगलगाय आली तरी प्रचंड किळस यायची, त्यात दोन प्रकार आठवतात, एक शंखाची गोगलगाय आणि एक बिनशंखाची. शंखाची गोगलगाय खुप शांत, कागदावर घेउन आम्ही बाहेर सोडुन यायचो, कध्धीच त्रास नाही द्यायचो, पण बिनशंखाची गोगलगाय खुप किळसवाणी, बोटभर लांब, दोन्ही टोकाला निमुळती, आपल्याच स्त्रावाची बारीक रेघ बनवत त्यावरुन सरकत येणारी ती वस्तु बघितली कि आम्ही डोळे मिटुन, एका जाड पुठ्ठ्यावर घेउन ती लांब बाहेर फेकायचो.
पहिल्या पावसाच्या आधी आठवडाभर अचानक एका संध्याकाळी 'चाचड' दिसायला लागायचे, म्हणजे इकडे पंखाच्या मुंग्या म्हणतात ते. अचानक यायचे कुठुनतरी खुप संख्येने, हे दिसायला लागले की आम्ही ओळखायचो की आठवड्याभरात पहिला पाउस नक्की. संध्याकाळी सगळे दिवे बंद करुन बसावं लागायचं. बरोबर प्रकाशाकडे आकर्षीत होतात हे कीडे. कधीकधी एक कागद तेलात बुडवुन ट्युबला दोर्‍याने बांधुन ठेवायचो चाचड येउ नयेत म्ह्यणुन. कमी यायचे त्यामुळे, पण यायचेच. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती तर हजारोंच्या संख्येने असायचे.
आमचं घर कडीपाटाचं, त्यामुळे पाली पण असायच्या भरपुर, सारख्या चुकचुकायच्या संध्याकाळच्या वेळेला, रात्री अंधुक प्रकाशाची डोळ्याला सवय झाल्यावर एखाद्या पालीची किडे पकडण्यासाठीची शांत तपश्चर्या बघताबघताच झोप लागायची.
मुंगळे जमात खुप मजेशीर, सारखे आपले गडबडीत, तुरुतुरु कुठल्यातरी मोहीमेवर, चावल्यावर खुप झणझणायचं. पण ह्याचे निरिक्षण घरापेक्षा अंगणात करायला मजा यायची. समोर आलेल्या काट्याकुट्यातुन, दगडातुन मार्ग काढुन स्वारी धावतेय पुढे. यांच दिशेच भान खुप आश्चर्यकारक असतं, तुम्ही बोटाने कीतीही लांब उडवा, दोनतीन मीनिटात पुन्हा आहे त्या ठिकाणी येउन प्रवास चालु.
मुंग्यांमधे लाल मुंग्यांची फार भीती वाटायची, कधी चुकुन पाय पडला तर मी खुप जोरात थयथयाट करायचो जागच्याजागी. पण काळ्या मुंग्यांच्या वाटेला मात्र कधीच गेलो नाही, का कुणास ठाउक, खुप आदर वाटायचा ह्या काळ्या मुंग्यांच्याविषयी, ह्यांना धावर्‍या मुंग्या का म्हणतात ते बघितल्याशिवाय लक्षात नाही यायचे तुमच्या.
माती उकरताना कधीतरी गांडुळ दीसायचं पण लगेच वळवळत मातीच्या ढिगात नाहिसं व्हायचं.
आमच्या गावाला खिंडीतल्या गणपतीला जाताना, पावसाळ्यात 'पैसा' दिसायचा, शेकडो पाय असलेला, तपकीरी लाल रंगाचा हा किडा, काडिने थोडा स्पर्ष केला तर लगेच ते शेकडो पाय पोटाशी आवळुन घेउन, अंगाचा अगदी बंद्या रूपायासारखा गोल करुन, घरंगळत जायचा. ह्याच गणपतीच्या बाहेत प्राजक्ताचा थोरला पार होता, रातराणी, चाफाही होता. ह्या पारावर रात्री आठच्या सुमाराला, खुप काजवे जमा व्हायचे, सतत हवेत उडत असायचे. त्या काळ्या कातळावरुन शांतपणे चालत जाणारा, एका लयीत लुकलुकणारा काजवा परत कधी तसा दिसला नाही.
खुप काही मिळवुन दिलय ह्या सगळ्यांनी मला, शब्दांत नाही सांगता येणार सगळं. अगदी एकटं एकटं वाटायचं तेव्हा हि सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली, आणि नकळत माझ्या बालपणाचा भागच बनुन गेली. अजुन भरुन येतय ते सगळे हरवलेले क्षण आठवुन.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
आत्ता ह्याक्षणी मी परत त्याच ठिकाणी गेलो तर दिसतील का हे सगळे मला, का माझीच नजर बदललीये.

Monday, June 14, 2010

ओंगळ समस्त, आम्ही नंगे..

 कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अ‍ॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्‍या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना..... तेवढ्यात प्रणव मुखर्जी चे स्टेटमेंट ऐकलं.."त्यवेळेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणुन, लोकक्षोभाचा विचार करुन आम्ही अ‍ॅन्डरसनला जाउ दिले"......म्हणजे पुन्हा खापर माझ्याच डोक्यावर.. पण त्यावेळेला कारखाना उभारताना काही तपासण्या झाल्या नसतील का?.... का त्यावर कुणी पर्यावरण खात्याच्या कारकुनाने पाचपन्नास रुपये घेउनच सही केली असेल.... मी काल ७/१२ घेताना दिली तीच असेल का ती नोट.... ईतकी रक्ताळलेली असुनही कशी चालली कुणास ठाउक....
मर्ढेकर हातात धरले कि नेहेमीच असं का होते.... सगळे प्रश्न शेवटी बुमरँगसारखे मलाच शोधत का येतात..

सत्तेचेच तुप | सत्तेचीच पोळी |
मानव्याची होळी | भाजाया ती ||
देवा ऐशी भूक | कासया दिलीस? |
झालो कासवीस | मीही नंगा ||
नंग्याचाच आता | येथे कारभार |
कोंडी आरपार | फोडा या ही ||
टिर्‍या अर्धपोट | जोवरी आहेत |
ओंगळ समस्त | आम्ही नंगे ||

- मर्ढेकर.

Friday, June 11, 2010

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - अंतिम भाग.

तिकडे केवळ सुकामेवा विकणारी अनेक दुकाने आहेत,(पण पिस्ते सोडुन ईतर सुकामेवा मध्यपूर्वेच्या ईतर देशात चांगला मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.) त्यातले एक दस्तचिन् (दस्त -हात, चिन् - निवडलेले) हे खुप प्रसिद्ध आहे (अस त्यांनीच सांगितले, मला काय माहीती हास्य ) त्या दुकानात पिस्ते खरेदी करायला गेलो, (कारण तेवढेच परवडणारे होते, तेल आणि गालिचे, "मला" विकले तरी परवडणार नाही) Sad , माझ्या सहकार्‍याने हिन्दुस्थान, आमीताब वगैरे नेहेमीचा पाढा वाचल्यावर गडी खुशीत आला. मला चीक्कार प्रकार दाखवल्यावर मला सगळ्यात आवडलेला (चव नव्हे किंमत) निवडला. एक अत्यंत सुंदर लाकडात कोरलेले ईराणी सौदर्यवतीचे चित्र पण खरेदी केल (दुधाची तहान ताकावर..) छायाचित्रक सापडला तर छायाचित्र टाकेन इथेच.
शेवटचे २ दिवस सगळ्यांच्याकडुन जेवणाची आमंत्रणे येत होती, पण मी कुठेच जाउ नाही शकलो. काही स्थानीक पक्वान्नं मात्र खायला मिळाली Party . त्यातला एक "अ‍ॅश" (ह्यातला 'अ‍ॅ' म्हणताना हे लोक ईतक्या लडिवाळपणे जिभ आत घेउन उच्चारतात की, तो उच्चार आणि तो पदार्थ यात अधिक मोहक काय हे सांगणे कठिणच) हा पदार्थ विशेष आवडला, थोडिशी चकोल्यांसारखी (वरणफळं पण म्हणतात ह्याला, म्हणजे चकोल्यांना, अ‍ॅश ला नव्हे) चव लागते. बाकीपण पदार्थ ठिकच. लॅट्युस चा वापर जास्त करतात, फ्रेंचांचा प्रभाव जेवणावरही जास्त दिसतो.
आतापर्यंत माझ्या हॉटेलवाल्याकडुन हवा तो पदार्थ करुन घ्यायची युक्ती माहीत झाली होती, त्याला 'वीजाय' अशी हाक मारली कि तो काय वाट्टेल ते करुन द्यायचा. (अमिताभचे नाव कुठल्यातरी चित्रपटात विजय होतं म्हणे thinking ) त्यामुळे चरत होतो आणि फिरत होतो
पर्शियन संगीत ह्याविषयी बरेच काही लिहिले जाऊ शकते, पण दुर्दैवाने मी तितका जाणकार नाही, हे संगीत क्षणार्धात आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जाते, ते संथ पण कमालीचे स्फुर्तीप्रद सुर ऐकुन मला क्षणभर कुमारजींची निर्गुणी भजने आठवली. एका रेस्त्राँमधे बसलो असताना, वाढदिवसाला वाजवायची पारंपारीक ईराणी धुन ऐकली, पियानोवर बसलेला पांढरर्‍या केसाचा बाबा असे काही सुर आळवत तल्लीन झाला होता की मी कितीतरी वेळ चक्कचक्क पुढ्यातले ताट विसरुन डोळे मिटुन बसलो होतो. (मला समोरचे जेवण विसरायला लावणारे संगीत स्वर्गीयच असले पाहिजे) या 'तावलोदेत मोबारक' गाण्याचे अगदी यथार्थ वर्णन पर्शियन लोक करतात "मोस्ट ब्युटीफुल बर्थडे साँग ऑन धिस अर्थ" ईकडे ऐका हवेतर आणी स्व्रतःच ठरवा.
आताशा त्या पारंपारीक संगीतामधे काही नवीन प्रवाह येउन मिसळतायत, पण मूळ लहेजा आणि डौल कायम आहे. त्यांच्या जुन्या संगीतकारापैकी एक "अनोशिर्वान रोहानी" ह्यांच्या काही रचना अप्रतीमच आहेत (त्यांचेही 'तावलोदेत मोबारक' ऐकुन बघा याडच लागेल). गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या आंदोलनात काही लोकप्रिय संगीतकार, गायकांनी खास गाणी रचून, गाउन ते आंदोलन आपल्यापरीने पेटते ठेवले होते. मला सतत सकाळसंध्याकाळ गाडीमधे नवनव्या पर्शियन रचना ऐकण्याची मेजवानी मिळत होती. Party
पर्शियातला मुक्काम संपत आला होता, मी ह्या सुंदर देशातली प्रत्येक गोष्ट मनात साठऊन घेत होतो, पाय खरच निघत नव्हता, आपला मुक्कम अजुन काही दिवस असायला हवा होता असं सारखे वाटत होते, जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ) शेवटी सामान व मन आवरुन विमानतळावर येउन थांबलो.
परतीच्या प्रवासात ईराण एअरचे विमान होते. बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. Crying (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती). ईराणी विमानकंपनी ही ईतर कुठेही नोकरी न मिळाल्यावर शेवटचा पर्याय म्हणुन त्या कर्मचार्‍यांनी निवडली असावी. ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या. Crazy नविन विमानखरेदी बहुदा खोमेनीच्या काळातच थांबवली असावी. त्या विमानकंपनीत आपल्याकड्च्या काही चित्रपट समीक्षकानीही शिरकाव करुन घेतला असावा बहुतेक. ईतके सुरेख पर्शियन चित्रपट सोडून, तद्दन रटाळ चित्रपट संपला की अतीरद्दड गाणी कि परत अती फड्तूस चित्रपट अशे शोधुन लावत होते.
त्या प्रवासात काही भैय्ये (राजसाहेबांच्या ठसक्यात म्हणुन पहा बरं)पण होते, त्यांच्या बायका नखशिखांत ईराणी पोशाखात होत्या (अर्थात विमान मुंबईत उतरेपर्यंतच, हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना.)
असो.. तर असा हा माझा पर्शियन अनुभव, तोडक्यामोडक्या शब्दात जसा जमेल तसा लिहीला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
आवडला तर नक्की कळवा. (म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्‍हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)

Thursday, June 10, 2010

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग ३

माझ्या त्यापुढच्या मुक्कामामधे असे बरेच राजकीय पैलू आढळत गेले. माझ्या उत्सुकतेपोटी (पक्षी आगावपणामुळे) एखादा शब्द बोलला गेला त्या देशाच्या कुठल्याही परीस्थितीवर, की लोक भरभरुन बोलत रहायचे, कित्येक संदर्भ नवीन उलगडत जायचे, पण चुकूनही कोणी उपहासाने हसले नाही की रागावले नाही. माझ्या भक्तांपैकी काहीजण मागच्या निवडणुकीच्या वेळेला आंदोलनात भाग घेतलेलेही होते. सध्याच्या राष्ट्राध्यक्षानी निवडणुकीत बळाचा वापर करुन विजय मिळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यानंतर बराच राडा झाला होता, आंदोलनात ७० -७५ जण मरण पावले, माझ्या निरीक्षणानुसार ह्यात तथ्य असु शकेल कारण मला भेटलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी कुणीच रिकामटेकडे नव्हते. (सगळे जण लठ्ठ पगारावर उच्चपदसस्थ होते, तरिही कळवळून बोलत होते.. जरा दुर्मीळच असे दृश्य)
ईराणमधे कुणीही नागरीक राष्ट्राध्यक्ष्याच्या निवडणुकीला उभे राहु शकतो फक्त त्यासाठी त्याला ईमाम व मौलवींच्या धार्मीक समितीची मान्यता घ्यावी लागते (आणि ती फक्त त्यांच्याशी एकनिष्ठ राजकारण करणार्‍यानाच मिळते Crazy ).
मला भेटलेल्या कुणालाही सध्या अमेरीकेशी चालू असलेल्या भांडणात रस दिसला नाही. अमेरीकेबरोबर भांडण लवकर संपवावे जेणेकरून आर्थिक व ईतर निर्बंध संपतील असाच सूर दिसला. ईराणचा अणुकार्यक्रम फक्त उर्जाउत्त्पादनासाठी आहे हे त्यांच्या सरकारचे मत मात्र पटत नाही. मी ज्या कंपनीत गेलो होतो तीच देशाच्या गरजेपैकी ८३% वीज बनवत होती - सगळीच्या सगळी तेलापासुन. आणि ईतके मुबलक तेल उपलब्ध असताना ईराण अणुउर्जेकडे वळेल हे असंभवनीय. पण ईराण ओपेक मधला दुसर्‍या क्रमांकाचा तेल ओकणारा देश आहे हे लक्षात घेतलेत तर अमेरीकेचे ह्या देशाबद्दलचे चालू व भविष्यातील राजकारण समजायला हरकत नाही.(सध्याचे तेलाचे भाव पेट्रोल ५ लिटर/१ डॉलर व डिझेल ६० लिटर/१ डॉलर)
४-५ दिवस रोज प्रवचन संपल्यावर मी सतत कुणा ना कुणा बरोबर भटकत होतो शहरामध्ये. वाह्तुककोंडी ची परीस्थिती जगातल्या कुठ्ल्याही मोठ्या शहराप्रमाणेच चांगली किंवा वाईट आहे. अमेरीकेबरोबर वाकडे असल्याने अमेरिकन गाड्या दिसतच नाहीत. मोजक्या जपानी गाड्या दिसतात पण जवळजवळ ९०% गाड्या फ्रेंच बनावटीच्या, प्युजोट कंपनीच्या आहेत. वाहतुकीचा सर्वात मोठा विशेष म्हणजे गाडी जर एकमेकाला ठोकली तरच हॉर्न वाजवतात. (कदाचीत ठोकल्यावर तो चालू आहे का हे बघायलाही वाजवत असावेत).ही अजीबात अतिशयोक्ती नाहीये. एके दिवशी प्रवचन संपल्यावर हॉटेलवर जाताना जरा डोळा लागला. काही क्षणाने जाग आल्यावर मी दचकलोच, आम्ही ट्रॅफीकजॅम मधे अडकलो होतो, मागे पुढे हजारो गाड्या होत्या पण स्मशान शांतता.
भारतीय बनावटीची एकाच प्रकारची दुचाकी दिसली - बजाज पल्सर. काही जणांनी मला 'ठाठा' च्या US$२००० कार बद्दल विचारले (मी लगेच त्याच कंपनीने जग्वार व लँडरोव्हर विकत घेतलिये हे सांगुन ह्या तीनही कंपन्या माझ्याच बापाच्या असल्यासारखा भाव मारला)
ईराणची मुख्य निर्यात तीन गोष्टीत संपते - तेल, गालिचे व पिस्ते. मला फक्त ईराणी गालिचे व पिस्ते ह्याविशयीच लिहिणे भाग आहे ( कारण तेलावर डोळा ठेउन अमेरिकेला कांपीटीशान केल्यास ख्योळ खलास व्हायचा)
ईराणी कार्पेट्स हा एक अतीसुंदर प्रकार आहे, तलम, मखमली, गुबगुबीत, रेशमी, नक्षिदार्, रंगीबेरंगी नानावीध प्रकार बघायला खरच डोळे पुरे पडत नाहीत. अनंत प्रकारची कलाकुसर, कुराणातले प्रसंग, आणि सगळ्यावर कडी म्हणुन शेवटी त्याने मला पर्शियन सौंदर्यवतीचे चित्र असलेला रेशमी गालीचा दाखवला, भिंतीवर लावायचा, आपण खलास.. (तेवढी किंमत विचारण्यापुर्वी तुमच्या बुडाखाली गुबगुबीत गालिचा आहे याची खात्री करुन घ्या, पडलात तर कं ज ना. )
जेवढ्या प्रकारचे गालिचे तेवढ्याच असंख्य प्रकारचे पिस्ते, पिस्त्यामधे पण फ्लेवर्स असतात ह्या वाक्याचा अर्थ समजायलाच १० मिनिटे लागली (मला बापड्याला पिस्ता हा एकच फ्लेवर माहीती होता )

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग २

सकाळी उठल्यावर परत हॉटेलच्या तळमजल्यावर जाउन नाष्ट्यासाठी मॅनेजरकडे माधुकरी मागायला सुरुवात केली, आमच्या दोघांचा अगम्य भाषेत गोन्धळ घालुन झाल्यावर, तो मला हाताला धरून कीचन मधे घेउन गेला. त्या आचार्‍याने, मी आणि मॅनेजरने थोडावेळ ईंग्रजीशी झटापट केल्यावर मी परवलीचा शब्द उच्चारला - हिंन्दुस्थान, आमीताब बाछ्छान.. पुन्हा समोर बटाटे, टमाटे, लॅट्युस वगैरे.(चला दीवसातले एक महत्वाचे काम तर झाले.)पण गेल्या काही तासांच्या अनुभवावरुन या देशाविष्यी उत्सुकता तर निर्माण झाली होती. त्यानंतर दिवसभर ह्या देशाविषयी प्रवचनामध्ये भक्तगणांच्याकडून (मी मलाही न कळणार्‍या विषयातला कॉर्पोरेट ट्रेनर आहे.. उगाच समजूतीचा घोटाळा नको..) शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. प्रत्येकाने त्या देशाची वेगवेगळी वैशीष्ठ्ये सांगितली पण एक सुर कायम होता - ईराणी सौंदर्यवती (बाकी याचा पुसटसा अंदाज वर्गातच आलाच होता.. माझ्याच वर्गात १२ पुरूष आणि ८ स्त्रिया.. चुकलो.. सुंदर स्त्रिया, पिस्ते आणि आमीताब बाछ्छान (काही ईराणी संस्कृतीचा अभिमान नसलेल्यांनी 'शॅहॅरूक खॅन' चं पण नाव घेतले, पण ते क्वचितच )
संध्याकाळी एका भक्ताबरोबर (अर्थातच आमीताभचा वशिला लाऊन ) तेहरान शहर पाहण्यासाठी बाहेर पडलो, आणि समोर उलगडत गेला एक सुंदर अनुभव..
थोडेसे जुन्या पद्धतिचे तेहरान शहर, अगदीच गगनचुंबी ईमरतींचे जंगल नाही आणि अगदीच पूणेरी पेठा पण नाहीत, थोडी नजर उंचावल्यावर आश्चर्याचा सुखद धक्काच. शहराच्या शेजारी अवर्णनीय सुंदर बर्फाच्छादीत पर्वतमाला. (माझ्या मध्यमवर्गीय मना.. स्वेटर आणला नाही हे आत्ता आठवायलाच हवयं का?) पण ह्या सर्वाहूनही अधिक सुंदर म्हणजे पर्शियन सौंदर्यवती. (तिथेच ईराण म्हणजेच पर्शिया हे त्याने सांगीतल्यावर पुन्हा अत्यानंद..) रस्त्यावरुन जाणार्‍यायेणार्‍या पर्शियन ललना पाहणार्‍याच्या मानेचा नक्कीच करकोचा करतात, ८-१० जरी पर्शियन सौंदर्यवती आपल्या चित्रपटसृष्टीत आणुन सोडल्या तर सगळ्या हीरवीणींना .**लाच लावतील.. मला आधी कळेना 'पहावं की न पहावं' (चाल - टू बी.. ऑर नॉट टू बी ) पण माझ्या सर्व प्रवासात जवळ जवळ सगळ्या चालकांनी आणि स्थानीक सहकार्‍यांनी.. " पर्शियन विमेन, वेरी ब्युतीफूल.. सी सी.. " म्हणून मलाच प्रोत्साहन दिले (त्यातल्या काहिंच्या डोळ्यात ' सरड्याची धाव कुंपणापर्यन्त' असा भाव का दिसला बरें..).
ईस्लामी राजवट आणि शरीया कायदा असल्यामुळे स्त्रियांना सर्व शरीर झाकून घेण्याची सक्ती. सगळ्याजणी काळा गुढग्यापर्यंतचा कोट (खालची निळी तंग जीन्स कुठल्या शरीयात बसत असेल? ) आणि डोक्यावर काळा रुमाल केस झाकण्यासाठी वापरतात, फक्त चेहरा व हात दर्शनिय. पण हा पोशाखाचा निर्बंध वगळता बाकि काही निर्बंध मलातरी आढळले नाहीत. सर्व व्यवहारांत स्त्रियांचा बरोबरीने सहभाग दिसतो.(त्यातल्यात्यात ड्रायव्हिंग करणार्‍या स्त्रिया हॉर्न न वाजवता आडव्या येउन आपण शिव्या द्यायला तोंड उघड्ल्यावर गोड हसून सूसाट वेगाने निघूनही जातात)
ईस्लामी राजवटीच्या बाकि असहिष्णु खुणा मात्र सतत जाणवत राहातात,दूरचित्रवाणी वर फक्त तीनच वाहिन्या आणि प्रत्येक वाहिनीवर नखशिखांत झाकलेल्या स्त्री पुरुषांच्या मालीका. (तीकडची एकता कपूर काय विषय वापरत असेल बरं ? बाकी ती एकता कपूर असेल तर तिला विषय कशाला लागेल म्हणा..) दिवसातून ५ वेळा नमाजाच्या वेळेला तीनही वाहिन्यांवर कुठल्यातरी मुख्य अथवा ऊप मौलविंचे नमाज प्रक्षेपण कंपल्सरी..आपल्याकडे हॉटेल मधे टॉवेलसाबण ठेवतात तसे प्रत्येक खोलीत नमाजाची सतरंजी आणि कुराणातील आयते लीहिलेल्या मातिच्या प्रतिमा ठेवणे कंपल्सरी. संपूर्ण दारुबंदी.(काळ्याबाजारात मीळतेच..) लोकांना व्यक्त व्हायला साधने कमी म्हणूनच असेल कदाचीत पण ईराण हा जगातला चौथ्या क्रमांकाचा ब्लॉगर देश आहे.
देशाचा कायदा मुस्लिम, सरकार कट्टर मुस्लिम. लोक मात्र कमालीचे सहीष्णु आणि ह्या सगळ्या घोळाला कावलेले दीसले.(अर्थात आता बहुतेक देशांतील परीस्थिती पहाता सर्व सरकारे समुद्रात नेउन बुडविली तर लोक सगळेच चांगले.) मी त्यांचं सरकार, कायदे वगैरेंविषयी टोकरल्यावर (आगावपणा, दुसरं काय?) सर्वात जास्त ऐकलेले वाक्य म्हणजे " वुई आर फर्स्ट पर्शियन.. देन मुस्लिम्स" , त्यांच्याकडून कळालेला ईतिहास असा. अरबस्थानांतून जशी आक्रमणें पुर्वेला हींन्दुस्थान वर झाली तशी पश्चिमेला त्यांच्यावर झाली, त्यानंतर तेथील स्थानीक पारशी लोक परागंदा होउन, जीव वाचवून भारतात आले. (पर्शियन म्हणजेच आपल्याकडचे पारशी हे समजल्यावर पुन्हा एकदा अचंबा, आ वासणे वगैरे वगैरे..) मग मीपण टाटा, वाडिया वगैरे पारशांची नावे सांगून जवळीक वाढवली.
तसे अमेरीकाविरोधी बोलणारे माझ्या पाहण्यात कोणी आले नाहि. पण रस्त्यांवर मात्र अमेरीकाविरोधी फलक काय, अमेरिकेच्या झेंड्यावर क्षेपणास्त्रे काय. याही बाबतीत जरा टोकरल्यावर अमेरीका विरोध सापडलाच नाही उलट आमच्याच सरकार चे जरा अती होतय असा सूर आढळला.(एकाने खोमेनीच्या पोस्टरखालीच ऊभे राहून हे सांगीतल.)
भारताविषयी व मुख्यतः चित्रपट्सॄष्टीविषयी आतोनात उत्सुकता. (काय नशीब बघा मी स्वतः ईराणी चीत्रपटांचा भोक्ता आहे (माझीद़ माझिदी वगैरे.) पण कोणी त्यविषयी बोलेचना. ईराणी संगीत, चित्रपट ईतके अप्रतीम असताना त्यांना बॉलीवूड कसे सहन होते अल्ला जाणे.) सारखे हींदुस्थान, आमीताब बाछ्छान चालूच. मी कीतिही वेळा ईंडिया म्हणालो तरी त्यांच्या मुखी हींदुस्थानच. माझे प्रवचन ज्या रस्त्यावर होते त्याचे नावही गांधी स्ट्रीट. मी हींदुस्थानमधुन आलोय हे कळाल्यावर लोक जरा जास्त आपुलकीने आदरातिथ्य करत होते, अर्थात याला एक राजकीय पैलूही असु शकेल, एकाने मला ईराण-हींदुस्थान भाई भाई हेपण ऐकवले. ईराण-ईंडिया गॅस पाईपलाईन बद्दल म्हणाला " तो पाकीस्तान तेवढा मधे तडमडतोय ना.. नाहितर केव्हाच झाले असतं ते."
क्रमशः

ईराण - पिस्ते, आमीताब बाछ्छान आणी मोहिनी - भाग १

पर्शिया ह्या शब्दाशी माझा संबंध याआधी फक्त दोन वेळा आला होता, पर्शियन मांजर आणि प्रिन्स ऑफ पर्शिया हा संगणक खेळ. त्यावेळी अजिबात वाटले नव्हते कि या नावाचा देश अस्तित्वात असू शकेल.
काही दिवसांपूर्वी ईराणला प्रवचन देण्याची सुपारी आल्यावर गडबडलो.. ईराण विशयी माझ्या ईष्ट (आणि अनिष्टही) मित्रांकडुन बरेच ऐकुन होतो, त्यावरून ह देश म्हणजे अगदिच हा.. आहे आसे वाटले होते.
आता हा देश जगाच्या पाठिवर कुठे आहे ते शोधण्यापासून सुरूवात, आता सुपारी घेतलिये म्हणल्यावर वि़ज़ा वगैरे लफडि आली,तो घेउन.(ईराणी विज़ा विषयी नंतर कधितरी सांगेन) राजधानी तेहरान मधे उतरलो (तिकिट मिळे पर्यन्त मी ईराणची राजधानी पर्शिया समजत होतो.) फक्त रात्री २ वाजता.(चाल - गावडेवाडीचा पत्ता, वार्‍यावरची वरात)
ईमाम खोमेनी (हा ईसम जिवन्त आहे का हो? thinking ) विमानतळावर असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या अवस्थेत उतरलो (त्यातील पोटापाण्याचा प्रश्न जास्त जहाल) आणि माझ्या स्वागतला येणार असलेल्या चालकाला शोधु लागलो (हा आणखी एक प्रश्न, कारण आमचे अ‍ॅडमिनमामा, प्रत्येक शहरात तुम्हाला अगदि वाजतगाजत न्यायचि सोय केली आहे असे तोंड भरुन आश्वासन देतात (त्याच्या बापाचे काय जातय,प्रत्यक्षात लीफ्ट मागुन हॉटेल शोधायला जावे लागते))
त्या बिचारया चालकाने हातात नामफलक धरलेला असुनही मी येडबंबुसारखा त्याच्याकडे न बघता सगळा एअरपोर्ट शोधुन काढला. शेवटी तोच कीव येउन सामोरा आला( जीव भांड्यात पडल्याचा आवाज येतो का हो. thinking ) आणी त्यानंतर आमचा संवाद असा.. फक्त रात्री २ वाजता
मी: फ्रॉम अबकड कंपनि?
चालक: सालाम (सलाम चा ईतका गोड उच्चार नवीन होता)(च्यायची.. हा अवसर्ग कसा देतात.)
मी: आय अ‍ॅम फ्रॉम पफबभ कंपनी
चालक: सालाम
मी: बोंबला
चालक: हॉटेल?
मी: आर वी गोइन्ग स्ट्रैट टू द हॉटेल?
चालक:... क ख ग ची अगम्य भाषा (ऐकायला चांगल वाटत होते पण त्याने पोट भरत असते तर नोकरी कशाला केली असती)
मी: हॉटेल? हॉटेल? Angry
चालक: हॉठेल
मी: विल आय बि एबल टू ऑर्डर माय डीनर अ‍ॅट धिस अवर?
चालक: क ख ग.. (स्वगत : आयला हे अवघडच होत चाल्लाय)
मी: फूड, डीनर, ईट.. (हातवारे पण करून सम्पले thinking )
चालक: क ख ग.. (आणी तो माझी बॅग उचलून चालायला लागला, मी संपलोच )
मी: ईग्लिश?
चालक: नो ईन्ग्लिश.. पर्शियन?
मी: झक मारली अन विचारले ह्याला. (पोटाचा प्रश्न बिकट होत चाल्लाय)
चालक: हॉटेल (गपगुमान गाडीत जाउन बसलो,आणी गार वारं अंगावर घेत, थंड डोक्याने जेवण मिळवण्याचा कट रचायला लागलो )
मी: यू? तेहेरान?
चालक:... ( होकारार्थी काहितरी अगम्य )
मी: आय अ‍ॅम फ्रॉम ईंडीया.. ईंडीया..
चालक: ईंडीया.. ईंडीया.. हीदुस्थान? हीदुस्थान? ( हे त्याच्याच शब्दात) (त्याला अत्यानंद, माझा गोंधळ)
मी: येस हीदुस्थान (हुश्श्श्श्श्श्श्श्श)
चालक: सेंटर ईंडीया डेल्लि न्यु..? (त्याने हे ३ वेळा विचारले, बहुतेक माझी परीक्षा घेत असावा. नन्तर उजेड पडला - भारताची राजधानी नवी दिल्ली )
मी: येस येस.. सेंटर ईंडीया डेल्लि न्युच (संवाद तर होतोय ना..)
चालक: हीदुस्थान.. मूव्हि.. आमीताब बाछ्छान.. (युरेका युरेका .. मी सिटवरून केवळ सिटबेल्टमुळे पडतापडता वाचलो)
मी: येस येस आमीताब बाछ्छान.. मुव्हिज..
आणी त्यानंतर त्या चालकाने माझे हॉटेल शोधून देउन, त्या हॉटेलच्या मॅनेजरला माझ्या जेवणाविषयी सांगुन, मला जेवताना आग्रह करुन, मला रूममधे सोडुन, सकाळी लवकर न्यायला येतो हे सांगून बिचारा रात्री ३:४५ ला मार्गाला लागला (मला सारखी शंका येत होती की हा मलाच अमिताभ समजला का काय?)
क्रमशः